Uncategorized

प्रबुद्ध नगर परिसरातील अस्वच्छतेवर तातडीने कारवाई – वंचित बहुजन युवा आघाडीच्या निवेदनाचा ठोस परिणाम

बारामती : प्रबुद्ध नगर येथील सार्वजनिक संडासातून सतत मैल्याचे पाणी बाहेर येत असल्यामुळे परिसरात प्रचंड अस्वच्छता व घाणीचे साम्राज्य पसरले होते. नागरिकांना जाण्या-येण्यात अडचणी येत होत्या तसेच संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला होता.

या गंभीर समस्येबाबत वंचित बहुजन युवा आघाडी तर्फे जिल्हाध्यक्ष मंगलदास तुकाराम निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली बारामती नगर परिषदेकडे निवेदन देण्यात आले होते. निवेदनानंतर नगरपालिकेने तातडीने कारवाई करून –

✔️ संडासातील मैल्याच्या पाण्याची गळती बंद केली,

✔️ परिसरातील जमा झालेला कचरा व चिखल हटवून स्वच्छता केली,

✔️ जंतुनाशक फवारणी करण्यात आली.

या कामामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून परिसरात स्वच्छ वातावरण निर्माण झाले आहे. हे यश हे सामूहिक आवाज, योग्य मागणी आणि ठाम पाठपुराव्याचे प्रत्यक्ष उदाहरण आहे.

वंचित बहुजन युवा आघाडी नेहमीच सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर आवाज उठवून प्रशासनाला जबाबदार धरण्याचे काम करीत आली आहे व भविष्यातही करत राहिन

मंगलदास तुकाराम निकाळजे

जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन युवा आघाडी

पुणे जिल्हा (पूर्व)

📞 8390041414

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!