Uncategorized

बारामतीत कसबा साठेनगर बनलाय अवैद्य धंद्याचा अड्डा

साठेनगर, कसबा बारामती परिसरात गेल्या काही काळापासून विविध प्रकारचे अवैध धंदे जसे की मटका, दारू विक्री, जुगार, ऑनलाईन चकरी व त्यामुळे साठेनगर परिसरात वावरणारे गुन्हेगार इतर गैरकायदेशीर उपक्रम – खुलेआम सुरू असल्याची गंभीर माहिती स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आली आहे. या अवैध धंद्यांमुळे परिसरातील शांतता, सुरक्षितता आणि तरुण पिढीचे भविष्य धोक्यात आले आहे.

 

नागरिकांनी वारंवार पोलिस प्रशासनाला गोपनीय तक्रारी करूनही ठोस कारवाई न झाल्याने लोकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. कायद्याच्या राज्यात असे गैरकायदेशीर धंदे चालणे हे शासन व प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे.

 

त्यामुळे नागरिकांच्या वतीने साठेनगर परिसरातील सर्व अवैध धंद्यांवर तातडीने आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच या धंद्यांना थेट किंवा अप्रत्यक्ष संरक्षण आणि गाळा किंवा जागा उपलब्ध करून देणाऱ्या व्यक्तींवर देखील कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत.

 

जर या मागणीची तात्काळ दखल घेतली गेली नाही, तर नागरिकांच्या वतीने शांततापूर्ण आंदोलन आणि जनजागृती मोहीम सुरू करण्यात येईल, असा इशारा देण्यात येत आहे.

 

साठेनगर अवैध धंदे मुक्त व्हावे, समाज सुरक्षित व्हावा अवैध धंदे बंद झाले पाहिजेत.हा जनतेचा ठाम आवाज आहे, प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!