वृक्षप्रेमी दादाच्या बारामतीत वृक्षाधिकारी यांच्या आशीर्वादाने अमाप वृक्षतोड ? कुंपणच शेत खायला लागलय दबक्या आवाजात नागरिकांमध्ये चर्चा

गेल्या अनेक वर्षापासून बारामती मध्ये विकासकामे चालू आहेत. बारामती म्हटलं की दादाची बारामती म्हणून बारामतीची प्रचिती आहे. आणि दादांची बारामतीत वृक्षप्रेमी म्हणून ओळख आहे. वाढत्या शहरीकरनामुळे बारामतीत अनेक ठिकाणी वृक्षतोड चालू आहे. याचाच फायदा घेत उद्यान विभागातील अधिकारी आणि कर्मचारी दादांच्या नावाचा फायदा घेत आर्थिक लागेबांधे करून आपल्या जवळच्या लाकूड तोड्याला वृक्षतोड करण्यास सांगून नफा मिळवत आहेत. त्यासाठी ते खाजगी लाकूड तोड्याला नगर पालिका उद्यान विभागात असणारे ट्रॅक्टर,मालवाहतूक गाडी, क्रेन व कंत्राटी कामगार सुध्दा वापरण्यास देत आहेत. काहीवेळा नगर पालिकेचे कंत्राटी कर्मचारी अर्जावर कारवाई करून तोडलेली लाकडे जळाऊ लाकडाच्या बखारीत विकत आहेत. त्याबद्दल कुणी जाब विचारला तर अरेरावीची भाषा करत उध्टपणे उत्तर देतात व हे दादांनी सांगितलेले काम आहे तुला काय करायचे आहे ते कर असे म्हणतात. अशा उध्टपणे वागणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई सुद्धा होत नाही म्हणून कुंपणच शेत खायला लागलय किंवा वृक्षप्रेमी दादाच्या बारामतीत वृक्षाधिकारी यांच्या आशीर्वादाने अमाप वृक्षतोड चालू आहे का? अशी दबक्या आवाजात नागरिकांमध्ये चर्चा चालू आहे. वृक्षतोड अधिनियम 1975 चे कलम 8 नुसार वृक्षतोड करत असताना परवानगी घेणे आवश्यक आहे. परंतु बाग आमच्या मालकीची असून परवानगी घेण्याची काहीच गरज नाही असं अधिकारी उद्धटपणे सांगतात.व काम आम्हाला लवकरात लवकर उरकायचे आहे.असे म्हणून अधिकाऱ्यानंकडूनच वृक्षतोड अधिनियम 1975 चे 21 प्रमाणे बेकायदेशीर वृक्षतोड होत आहे. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई होते का हे पाहणे महत्त्वाचे आहे. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचं ऱ्हास होतो. पर्यावरणाचा ऱ्हास रोकण्यासाठी पृथ्वीचा 33 टक्के भूभाग वनाखाली असणे गरजेचे आहे.आत्ता सध्याला पृथ्वीचा 20 टक्के भूभाग वनाखाली त्यातून अजून वृक्षतोड होत आहे. गेल्या उन्हाळ्यात पृथ्वीचे तापमान 45 अंश सेल्सिअस वर गेले होते. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी माणसाला वृक्षाच्या सावलीची गरज पडत होती .
