Uncategorized

बारामती मध्ये रस्त्याच्या कामासाठी रस्ता रोको आंदोलन आंदोलन कर्ते राज कुमार यांनाच रस्त्याच्या खड्ड्यामध्ये पडून दुखापत.

बारामती मधील उत्कर्षनगर येथे नैसर्गिक ओढा वाहत असल्याने उत्कर्षनगर रोड वरून त्याचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असून उत्कर्षनगर रोड मोठ्या प्रमाणात खचलेला आहे त्यामुळे शाळेत जाणाऱ्या येणाऱ्या व कामावरती जाणाऱ्या लोकांना ओढ्याच्या पाण्यामधून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असून या संदर्भात दहा दिवसांपूर्वी राज कुमार व बाळासाहेब चव्हाण यांनी ओढ्याच्या घाण पाण्यामध्ये बसून आमरण उपोषण केले होते. त्यावेळी नगरपालिकेने आठ दिवसांमध्ये पाण्याचा विसर्ग करून रस्त्याचे काम केले जाईल अशा प्रकारचे आश्वासन दिले होते.

परंतु नगरपालिकेने याबाबत कोणत्या प्रकारे दखल घेतली नाही शिवाय रोडवर अतिक्रमण काढले नसल्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बारामती मधील उत्कर्षनगर येथील नागरिकांनी बारामती भिगवण रोड वरती रस्ता रोको आंदोलन केले.

भिगवन रोड या ठिकाणी बारामती पोलीस ठाणे हस्तक्षेप केल्यानंतर सर्व आंदोलन करते यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली व रस्त्याचे काम लवकरात लवकर चालू करावे व बेकायदेशीर अतिक्रमण काढावे याची मागणी केली.

यावेळी बारामती व उत्कर्ष नगर मधील रहिवासी तसेच वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!