अकोला, छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि सोलापूर महापालिकेमध्ये वंचित आघाडीचं उमेदवार विजयी
राज्यातील 29 महापालिका निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. सत्तधारी भाजप आणि शिवसेनेनं बऱ्याच महापालिकांमध्ये आघाडी घेतली आहे. काही ठिकाणी भाजप आणि शिवसेनेचे उमेदवारही विजयी झाले आहे. पण, दुसरीकडे प्रस्थापितांना धक्का देत वंचित आघाडीने आपली ताकद दाखवून दिली आहे. अकोला, छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि सोलापूर महापालिकेमध्ये वंचित आघाडीचं निळं वादळं आलं आहे.प्रकाश आंबेडकर साहेब यांचं होमग्राऊंड असलेल्या अकोला महापालिकेमध्ये वंचित आघाडीने विजयी सुरुवात केली आहे. अकोला महानगरपालिका प्रभाग क्रमांक 14 मधून वंचित बहुजन आघाडीचे पॅनल विजयी झाले आहे. जयश्रीताई महेंद्र बहादूरकर, पराग रामकृष्ण गवई आणि शेख समशू कमर शेख साबीर हे पॅनल विजयी झालं आहे. तर अकोला महानगरपालिका निवडणुकीत 1600 मतांनी निलेश देव यांचा विजय झाला आहे.अकोला पालिकेतील विजयी उमेदवार
1) उज्वलाताई प्रवीण पातोडे
2 जयश्रीताई महेंद्र बहादूरकर
3)पराग रामकृष्ण गवई
4) शेख समशू कमर शेख साबीर
५)निलेश देव
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीमध्ये एकीकडे भाजपने आघाडी घेतली आहे. वंचित आघाडीने स्वबळावर निवडणूक लढत ४ जागा जिंकल्या आहे.
तर, काँग्रेस गट आणि देशमुख कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या लातूर महानगर पालिकेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे 5 पैकी 4 उमेदवार विजयी झाले आहे. लातूरमध्ये बहुजन मतांची संख्या ही जवळपास १२ टक्के आहे. पण, वंचितच्या छताखाली मतदार एक झाले आणि पाच पैकी ४ ही उमेदवारांना विजयी करून दिलं आहे. लातूरमधला वंचित आघाडीचा विजय हा सगळ्या मोठा समजला जात आहे.
लातूरमधील विजयी उमेदवार
प्रभाग 13 अ
अमोल भाऊ लांडगे
प्रभाग क्र 04 अ
सचिन अर्जुन गायकवाड
प्रभाग क्र. 07 अ
निकिता रोहित सोमवंशी
प्रभाग क्र.02 अ अंकिता प्रशांत भडीकर