वंचित बहुजन आघाडी बहुजन पक्षांना सोबत घेऊन जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढवणार – राज कुमार जिल्हाध्यक्ष

वंचित बहुजन आघाडी इंदापूर तालुक्याच्या वतीने आज जंक्शन ता. इंदापुर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकी संदर्भात महत्वपूर्ण मीटिंग संपन्न झाली, त्यामध्ये बोलताना जिल्हाध्यक्ष राज कुमार म्हणाले पुणे जिल्ह्यातील व इंदापूर तालुक्यातील बहुजन व समविचारी प़क्षांना सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडी जिल्हा परिषद व पंचायत समिती ची निवडणूक मोठ्या ताकतीने लढवणार आहे.
नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक मोठ्या प्रमाणात निवडून आले आहेत, त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची ताकत महाराष्ट्रामध्ये व पुणे जिल्ह्यात माठ्या प्रमाणात वाढलेली आहे. ज्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये व तालुक्यामध्ये आरक्षण असलेल्या ठिकाणी बहुजन वर्ग जास्त असल्याने तो हक्काचा मतदार वंचित बहुजन आघाडीचा असल्यामुळे त्या ठिकाणी तर वंचित बहुजन आघाडी निवडून येईलच परंतु जनरल जागेवरती देखील ओबीसी उमेदवार देऊन नवीन बदल घडवून आणण्याचा प्रयत्न वंचित बहुजन आघाडी करणार आहे.मिटींगचे आयोजन इंदापूर तालुका महासचिव विशाल सोनवणे यांनी केले होते.
यावेळी वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा व इंदापूर तालुक्यातून मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडी मधून जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणारे उमेदवार ही उपस्थित होते.